Bhimnagar
-भिमनगरातुन- भिम नगरातुन जाताना पाहत निघालो छोट्यास्या जाणार्या वाटेच्या बाजुला मोठ्या दीमाखात ऊभारलेल्या छोट्यास्या घराना आशोक चक्र रंगवताना महापुरूषाचे प्रतिमा मायेने पुसताना थकलेल्या पायान,नव्वदी पार केलेल्या आजीन माझा भिम येतोय या ऊर्जेन साफ सफाई करताना पाहत निघालो लहान मुल खेळणे बाजुला ठेऊन पताके लावताना कामाला सुट्टी देऊन,युवा मंडळी जयंतीच नियोजन करताना तिन चाकी सायकलीवर बसुन माझा भिम येतोय गाणार्या पुरूषाला पाहत निघालो गरीबीत बुडालेल्या या गल्लीत भिमजयंतीच्या ओढीने हसताना सार्या जगाच सुख या गल्लीत नांदताना मंद गतीने पाऊले टाकत पाहत निघालो चालत चालत गल्लीच्या बाहेर निघालो दुसर्याच्या तोंडावर बारा वाजलेले पाहीलो बाप विसरताना पाहीलो विचार केलो का बर ईतके ते लोक आंनदी माझ्याकडेच पाहीलो चार दीवसापुर्वी बापाकडे पैसे मागीतलो जोड करेन जयंतीपर्यत म्हणालेल्या बापाने जयंतीच्या आधल्यादीवसी पैसे पाठवले आणी मी जयंतीच्या ओढीने कपडे घेयाला निघालो मी माझ्या स्व:ताकडेच पाहीलो कारण भिमामुळे मी माणुस बनालो - मनो...