Posts

साठे जयंती

आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त..          [ अजुनही समजलाच नाही ] मी गावातुन रोज बसने कॉलेजला ये जा करायचो.गावापासुन देगलुर हे १८ की.मी  आहे.देगलुरला माझी आत्या असते म्हणुन मी रोज तीच्या घरी जायाचो. तीन वर्षापुर्वी १ ऑगष्ट २०१४ रोजी मी साठे जयंतीला  आत्याच्या घरी गेलो होतो.कारण गावातील जयंत्या काही दीवसानंतर असतात.मी गल्लीत गेलो जयंतीची तयार्या चालु होत्या.थोडावेळ थांबुन मी घराकडे निघालो.पलंगावर बसुन जेवन करत होतो.आत्या आगोदरच समोर बसुन होती.हा सगळा सणासारखा जल्लोष दरवर्षी पाहुन तीन एक मला प्रश्न विचारल   खरच तो प्रश्न विचारात पाडणारा होता. बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांच्या घरात अडकवलेल्या फोटोना पाहत आत्या म्हनाली “मनोज हे जिवंत आहेत की मेलेत. आता हे कुठे राहतात” मी तर तिथे हासलोच आणि थोड्या वेळाने ऊत्तर दीलो “ते ईथे नाहीत ते मेलेत पण आपण हे जे चांगल जिवन जगतोय त्याच्याचमुळे.आता मी शिकत आहे ते बाबासाहेबा मुळे म्हणुन आपण त्यांची जयंती साजरी करतो” आत्यान विचारलेला प्रश्न ऐकुन माणुस हासतोच मीही हासलो पण तीच्यावर नाही.जे दहा पंधरा वर्षा...

Bhimnagar

-भिमनगरातुन- भिम नगरातुन जाताना पाहत निघालो छोट्यास्या जाणार्या वाटेच्या बाजुला मोठ्या दीमाखात ऊभारलेल्या छोट्यास्या घराना आशोक चक्र रंगवताना महापुरूषाचे प्रतिमा मायेने पुसताना थकलेल्या पायान,नव्वदी पार केलेल्या आजीन माझा भिम येतोय या ऊर्जेन साफ सफाई करताना पाहत निघालो लहान मुल खेळणे बाजुला ठेऊन पताके लावताना कामाला सुट्टी देऊन,युवा मंडळी जयंतीच नियोजन करताना तिन चाकी सायकलीवर बसुन माझा भिम येतोय गाणार्या पुरूषाला पाहत निघालो गरीबीत बुडालेल्या या गल्लीत भिमजयंतीच्या ओढीने हसताना सार्या जगाच सुख या गल्लीत नांदताना मंद गतीने पाऊले टाकत पाहत निघालो चालत चालत गल्लीच्या बाहेर निघालो दुसर्याच्या तोंडावर बारा  वाजलेले पाहीलो बाप विसरताना पाहीलो विचार केलो का बर ईतके ते लोक आंनदी माझ्याकडेच पाहीलो चार दीवसापुर्वी बापाकडे पैसे मागीतलो जोड करेन जयंतीपर्यत म्हणालेल्या बापाने जयंतीच्या आधल्यादीवसी पैसे पाठवले आणी मी जयंतीच्या ओढीने कपडे घेयाला निघालो मी माझ्या स्व:ताकडेच पाहीलो कारण भिमामुळे मी माणुस बनालो            - मनो...

भिमसैनीक साहीत्यसम्राट आण्णा भाऊ साठे

Image
तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे (ऑगस्ट १, इ.स. १९२० हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले [संदर्भ हवा]. अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णा भाऊ साठे म्हणजे जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांड...

लेखनी ढसाळाची

बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त हक्कासाठी मैदनात उतरवीत होती मानस शब्दातच भरला होता आगेचा निखारा जागी करत होती, भीम सागर हा सगळा भरला लाटेनी किनारा,शब्दानी उसळी शब्दा शब्दा ने बनली कवीता झोपलेल्या मानसाला उठवी बोलत होती लेखनी सळसळवीत होती रक्त गुलामी होती संपवत आन्यायाविरोद्धात होती लढत मानुसकीची लढाई लढत होती मानस आजही लढा चालू ,लढत आहेत मानस                               - गायकवाड मनोज कोंडीबाराव

जिजा

Image
जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला बाप तुझा गरीबीची पुजा करत गेला आंगावरती चिद्या,पायात घुगरू बाधून निच प्रथा पुढे नेत गेला पोटासाठी लाचार पोतराच जगन भिक मागुन नाही घरात दान झोली भरायला दारोदार फिरन जिजा,      पोतराजाचा पोरगा तु तुला बाबासाहेब कळला म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला डोक्यावरती देवीच वड वाढल होत तीनच समाजाला गुलामीत ठेवल होत तुला भिमसुर्य कळला आंधारतल्या वाटेवरती ऊजेड दीसला तुझ्या पोतराज बापाची ऊर्जा आली कामा मागीन मी चार घर जास्त महाराच्या पोरासारख शिक येथुन तुझा भिमसंघर्ष सुरु झाला शिक्षणास तुझ्या प्रारभ झाला आन्याय,आत्याचार,गुलामी च्या विरोधात मनुवाद्यान्या फाडण्यासाठी पॅथर उभी झाली त्यात तुही गर्जरास नामांतरात भाग तु घेतलास आस्मिमेतेचा लढा तु लढलास भिमसैनीकाच कार्य तु केलास गुलामी,आन्यायाचे ओझे डोकी घेऊन वाहण्यार्याचे झाडे तु कापलास बापासहीत दुसर्यानाही मुक्त केलास सामाजिक स्वातंत्र्यासाठी,गावकुशीचे काम सोडवण्यासाठी,आर्थिकदुस्थ्या संपन्नतेसाठी आभिमानाच्या...

एकनाथ आवाड

Image
बीड जिल्हातल्या दलित चळवळीत नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड (किंवा एकनाथ आवाड) ह्यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील दुकडेगावात (डुकरेगावात) एका गरीब मातंग समाजातील पोतराजाच्या घरी झाला. वडिलांचे नाव दगडू आणि आई चे भागूबाई. शिक्षकांनी शाळेत दाखल करताना १९ जानेवारी १९५६ ही तारीख लिहिल्यामुळे तीच त्यांची अधिकृत जन्मतारीख झाली. घरात खायला दाणा नाही, वडील मागून आणतील त्यावर गुजराण करावी लागे. एकनाथाने पोतराजच व्हावे अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने कडाडून विरोध केल्याने त्यांना शाळेत जायला मिळाले. शाळेत मागच्या बाकावर बसूनच ते शिकले. आव्हाडांनी घर सोडले, अंगमेहनत करून पैसे मिळवले आणि शिक्षण घेतले. एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण बीड आणि अहमदनगर येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्‌एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले. वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्‍यांनी पोतराजाच्या प्रथेत...

भिमसैनीक नामदेव ढसाळ

Image
नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९ पुणे जिल्हा मृत्यू: जानेवारी १५ इ.स. २०१४[१]) हे मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते होते. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयांवरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले. नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचे बालपण गेले. त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत श्रद्धा होती. दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होता. .त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबई...