साठे जयंती
आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त.. [ अजुनही समजलाच नाही ] मी गावातुन रोज बसने कॉलेजला ये जा करायचो.गावापासुन देगलुर हे १८ की.मी आहे.देगलुरला माझी आत्या असते म्हणुन मी रोज तीच्या घरी जायाचो. तीन वर्षापुर्वी १ ऑगष्ट २०१४ रोजी मी साठे जयंतीला आत्याच्या घरी गेलो होतो.कारण गावातील जयंत्या काही दीवसानंतर असतात.मी गल्लीत गेलो जयंतीची तयार्या चालु होत्या.थोडावेळ थांबुन मी घराकडे निघालो.पलंगावर बसुन जेवन करत होतो.आत्या आगोदरच समोर बसुन होती.हा सगळा सणासारखा जल्लोष दरवर्षी पाहुन तीन एक मला प्रश्न विचारल खरच तो प्रश्न विचारात पाडणारा होता. बाबासाहेब आणि आण्णाभाऊ साठे यांच्या घरात अडकवलेल्या फोटोना पाहत आत्या म्हनाली “मनोज हे जिवंत आहेत की मेलेत. आता हे कुठे राहतात” मी तर तिथे हासलोच आणि थोड्या वेळाने ऊत्तर दीलो “ते ईथे नाहीत ते मेलेत पण आपण हे जे चांगल जिवन जगतोय त्याच्याचमुळे.आता मी शिकत आहे ते बाबासाहेबा मुळे म्हणुन आपण त्यांची जयंती साजरी करतो” आत्यान विचारलेला प्रश्न ऐकुन माणुस हासतोच मीही हासलो पण तीच्यावर नाही.जे दहा पंधरा वर्षा...