जिजा
जिजा,
पोतराजाचा पोरगा तु
तुला बाबासाहेब कळला
म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला
बाप तुझा गरीबीची पुजा करत गेला
आंगावरती चिद्या,पायात घुगरू बाधून
निच प्रथा पुढे नेत गेला
पोटासाठी लाचार पोतराच जगन
भिक मागुन नाही घरात दान
झोली भरायला दारोदार फिरन
जिजा,
पोतराजाचा पोरगा तु
तुला बाबासाहेब कळला
म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढला
डोक्यावरती देवीच वड वाढल होत
तीनच समाजाला गुलामीत ठेवल होत
तुला भिमसुर्य कळला
आंधारतल्या वाटेवरती ऊजेड दीसला
तुझ्या पोतराज बापाची ऊर्जा आली कामा
मागीन मी चार घर जास्त
महाराच्या पोरासारख शिक
येथुन तुझा भिमसंघर्ष सुरु झाला
शिक्षणास तुझ्या प्रारभ झाला
आन्याय,आत्याचार,गुलामी च्या विरोधात मनुवाद्यान्या फाडण्यासाठी
पॅथर उभी झाली त्यात तुही गर्जरास
नामांतरात भाग तु घेतलास
आस्मिमेतेचा लढा तु लढलास
भिमसैनीकाच कार्य तु केलास
गुलामी,आन्यायाचे ओझे डोकी घेऊन वाहण्यार्याचे
झाडे तु कापलास
बापासहीत दुसर्यानाही मुक्त केलास
सामाजिक स्वातंत्र्यासाठी,गावकुशीचे काम सोडवण्यासाठी,आर्थिकदुस्थ्या संपन्नतेसाठी
आभिमानाच्या घासेसाठी जमीनीचा तुकडा तु दीलास
आन्याय लाडग्याने केला तर
वाघ तु झालास
तुझ्या पहाडी आवाजाने
मनूवादी बैल झाले.
तु होतास भिमवादळ
तु जाताच गुलामीकडे
दारे बंद झाले
सार्या महाराष्ट्रात तुझी दहशत
आन्याय,आत्याचार,गुलामीचा तु दुश्मन
आखेर पर्यत तु सघर्ष करत राहीलास
भिमान दीलेला मानवतेचा बुध्द तु स्वीकारास
भिमाच्या त्रिशुत्रावरीती आखेरपर्यत चाललास
बुध्द फुले शाहू आंबेडकर साठे याच्या विचार घेऊन तु घडलास
जिजा ,
पोतराजाचा पोरगा तु
तुला बाबासाहेब कळला
म्हणुनच तु मानवी हक्कासाठी लढलास
जिजा मला,तु चाललेल्या भिमाच्या वाटेवरती चालायचे
तुला आठवुनी सघर्ष करायचे आहे
-मनोज कोंडीबाराव गायकवाड
मानवी हक्क आभियानाचे संस्थापक
Adv एकनाथ आवाड याच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा

लय लयभारी कविता
ReplyDeleteलय लयभारी कविता
ReplyDelete